महाड दुर्घटना : बस नदी कोसळण्याआधी हॅन्डब्रेक खेचला पण...

महाड दुर्घटना : बस नदी कोसळण्याआधी हॅन्डब्रेक खेचला पण...

  • Share this:

महाड, 12 ऑगस्ट : महाड पूल दुर्घटनेच्या नऊ दिवसांनंतर राजापूर-बोरीवली बसचा सांगडा बाहेर काढण्यात आलाय. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्याआधी एसटी चालकाने शर्थीचे प्रयत्न करून बसला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. पण, दुदैर्वाने ही बस नदीत कोसळली. बसचालकाने हॅन्डब्रेक खेचला असल्याचं आता समोर आलंय.bus_panchanama

काल गुरुवारी सावित्रीच्या पात्रात सापडलेल्या राजापूर मुंबई एसटी बसेसचे अवशेष क्रेनच्या साहाय्यानं बाहेर काढण्यात आले. या बसचा आज पंचनामा करण्यात आला. तेव्हा बसचालकाने पूर्ण ताकदीने बस नदीत कोसळण्यापासून प्रयत्न केले होते. राजापूर बोरीवली या एसटी बसच्या ड्रायव्हरने बस थांबवण्यासाठी बसचा हँन्डब्रेक खेचला होता. माञ तरी देखील बस थांबली नाही.

ज्या वेळी अपघात घडणार अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा हॅन्डब्रेक ओढला जातो. त्यामुळे वाहनाच्या समोरची चाक जागीत थांबता. त्यामुळे वाहन जागेवरच थांबतं. एखाद्यावेळेस वाहनाचा स्पीड जास्त असला तर 360 डीग्रीमध्ये वाहन फिरते. अशा वेळी वाहन पलटीही होते. महाड दुर्घटनेतही असंच काही घडलं असावं.

बसचालकाने जेव्हा समोर पुल कोसळलेला दिसला असेल किंवा पुल कोसळतोय हे पाहिल्यावर हॅन्डब्रेक खेचले असेल. पण एखाद्यावेळेस बसची स्पीड जास्त असल्यामुळे ती थांबली नसेल आणि थेट नदी कोसळली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एखाद्यावेळेस या बसचा हॅन्डब्रेक निकामी झाला असेल तर या दुर्घटनेला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थिती होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 12, 2016, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading