12 ऑगस्ट : सैराट सिनेमातील आर्ची, परश्याची क्रेज अजूनही कायम आहे. म्हणूनच की काय भारतातील पहिल्या मेणाचे संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियम मध्ये आर्ची, परश्या आणि नागराज मंजुळे यांचे मेणाचे पुतळे तयार करण्यात येणार आहे.
या वॅक्स म्युझियमचे संचालक सुनील कंडलूर यांनी आकाश, रिंकू आणि नागराज यांच्या चेहर्यांचं मोजमाप घेतलं असून येत्या दोन महिन्यात हे मेणाचे पुतळे तयार होतील अशी माहिती सुनील कंडलूर यांनी दिली.
सैराट सिनेमाच्या यशानंतर सध्या आर्ची-परश्याची क्रेज सर्वत्र वाढली आहे. रिंकू, आकाश आणि नागराज मंजुळे यांच्या हस्तेच या पुतळ्यांचे अनावरण करण्यात येणार असल्याचं सुनील कंडलूर यांनी सांगितलं.
सध्या सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियममध्ये अनेक क्रांतीकारक, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, अभिनेते, अभिनेत्री यांचे जवळपास शंभर मेणाचे पुतळे आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv