S M L

अमेरिकेत पुन्हा शाहरुखची चौकशी, ट्विटरवरून व्यक्त केली नाराजी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 12, 2016 12:48 PM IST

अमेरिकेत पुन्हा शाहरुखची चौकशी, ट्विटरवरून व्यक्त केली नाराजी

12 ऑगस्ट :  बॉलिवूड किंग खान अमेरिका एअरपोर्टवरील इमिग्रेशन हे समीकरण आता नवं नाही. पुन्हा एकदा किंग खानला अमेरिकेच्या विमानतळावर इमिग्रेशनसाठी थांबवण्यात आलं आहे. यासंदर्भातील शाहरूखनं स्वत:च त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केलं आहे.

अभिनेता शाहरूक खानला अमेरिकेतील लॉस एंजेलिस विमानतळावर पुन्हा एकदा अडवण्यात आलं. शाहरूक म्हणाला, सुरक्षेबाबत अडवणूक करणे हे मी समजू शकतो. त्याचा मी आदरही करतो. मात्र, इमिगेशन विभागाने दरवेळी असे अडवणूक करण्याला मी कंटाळलो आहे, असे त्याने स्पष्ट केले. शाहरूक आपल्या मुलांसोबत अमेरिकेसाठी प्रवास करत होता.

खरतर 2009 मध्ये नेवार्क लिबर्टी इंटरनॅशनल एयरपोर्टवर आणि 2012 साली सुद्धा न्यूयॉर्क विमानतळावर शाहरूखला सुरक्षेच्या मुद्यावरून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची सखोल चौकशी झाल्यावर मग त्याला सोडून देण्यात आलं. मात्र या घटनेला तो विसरला असल्याचं देखील म्हणाला होता. परंतू आज याची पुनरावृत्ती झाल्यामुळे त्यानं त्याची नाराजी ट्विटरवर व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2016 12:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close