#रिओअपडेट्स : सानिया-रोहन जोडी उपांत्यपूर्व फेरीत

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2016 09:56 AM IST

#रिओअपडेट्स : सानिया-रोहन जोडी उपांत्यपूर्व फेरीत

13saniabops2-620x40012 ऑगस्ट :  भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या जोडीने रिओ ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सानिया- रोहन जोडीने ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूर आणि जॉन पियर्स यांचा 7-5, 6-4 असा पराभव केला.

हा सामना बुधवारी होणार होता. मात्र मुसळधार पावसामुळे शुक्रवारी खेळवण्यात आला. सानिया- रोहन यांनी सामन्याच्या सुरुवातीपासूनच दबदबा ठेवला.

ऑलिम्पिकमध्ये चौथे मानांकन मिळालेल्या भारताच्या जोडीने पहिल्या सेटमध्ये 5-4 अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतरचा गेम गमवल्यामुळे 5-5 अशी बरोबरी झाली. अखेर सानिया-बोपण्णाने पहिला सेट 7-5 असा जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये भारतीय जोडीने शानदार खेळ करत ऑस्ट्रेलियाच्या जोडीचा सहज पराभव केला.

Loading...

उपांत्यपूर्व फेरीत सानिया - रोहनची लढत इंग्लंडच्या अँडीमरे आणि हेदर वॉटसन या जोडीशी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2016 09:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...