मला न्याय पाहिजे, एका बलात्कार पीडितेची हाक !

मला न्याय पाहिजे, एका बलात्कार पीडितेची हाक !

  • Share this:

11 ऑगस्ट : बलात्कार मुक्त भारत होईल तेव्हा होईल पण बलात्कार पीडित महिलाना न्याय मिळतोय का ? या महिलानी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीना अटक केली जातेय का ? तर याचं उत्तर नाही असंच द्याव लागतंय. कारण आता आम्ही तुम्हाला दाखवतोय एका बलात्कार पिडित महिलेची कहाणी जी गेले सहा महिने आपल्याविरोधात झालेल्या अन्यायाची दाद मागतेय. तिच्यावर बलात्कार करणार्‍या आरोपीला अटक करण्याची मागणी करतेय आणि हा आरोपी आहे काँग्रेसचा कार्यकर्ता..आरोपीवर गुन्हेही दाखल झालेयत पण आरोपी फरार आहे.mahad_rape_Case

ही घटना आहे 15 फेब्रुवारी 2016 ची .. महाड मधल्या एका 29 वर्षांच्या महिलेवर तिला गुंगीचं औषध देऊन बलात्कार करण्यात आला सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा पीडितेचा नातेवाईकच आहे. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी इनायत हुरजूक याच्यावर महाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला .पण तेव्हापासून हा आरोपी फरार आहे. तरीही पोलीस त्याला पकडत नाहीये कारण तो आहे काँग्रेसचा कार्यकर्ता....विशेष म्हणजे हायकोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळलाय तरीही पोलिसांकडून या इनायत हूरजूकला पकडण्यासाठी पोलीस कोणतेच विशेष प्रयत्न होत नसल्याचा आरोप पीडीतेनं केलाय.

कोण आहे हा इनायत हुरजूक ?

वय वर्षे 51

गोरेगावच्या INT स्कूल ऍकॅडमीचा चेअरमन

हरकोल गावचा काँग्रेस पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता

दाखल झालेले गुन्हे 376/328/313/506/67

इनायत हुरजूक चा जामीन हायकोर्टाने 28 जुनला नाकारला, तेव्हापासून फरार

ही महिला विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही दाद मागण्यासाठी भेटली. विखे पाटलानी या मुद्द्यावर या अधिवेशनात स्थगन प्रस्तावाची मागणीही केली पण अद्यापही या महिलेला दाद मिळालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2016 10:44 PM IST

ताज्या बातम्या