तब्बल नऊ दिवसांनंतर वाहून गेलेली बस सापडली

तब्बल नऊ दिवसांनंतर वाहून गेलेली बस सापडली

  • Share this:

bus_mahadमहाड, 11 ऑगस्ट : महाड पूल दुर्घटनेत सावित्री नदीत वाहून गेलेली बस तब्बल नऊ दिवसांनंतर सापडली आहे. पुलापासून 200 मीटरच्या परिघात ही बस सापडली आहे. राजापूर -बोरीवली जाणारी एमएच 40-एन 9739  क्रमांकाची ही बस आहे.

मुसळधार पावसामुळे सावित्रीला भीषण असा पूर आला होता. त्यामुळे नदीत शोधकार्याला अडथळा येत होता. आज पाऊस ओसरल्यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाली. सकाळी साडे नऊच्या सुमारास नेव्हीच्या डायव्हर्सची टीम बसच्या शोधासाठी पाण्यात उतरली होती. या टीमला बसचे दोन तुकडे सापडलेत. या तुकड्यांमध्ये प्रवाशांचे मृतदेह नसल्याची माहिती त्यांनी दिलीये. ज्या ठिकाणी बसचे अवशेष आहेत. अवशेषांना बलून एँकर लावण्यात आलेत.

या शिवाय क्रेनही बोलावण्यात आल्यात. क्रेन आल्यानंतर बसला बाहेर काढण्यात यश आलंय.  जेव्हा या बसला बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याबसची अवस्था पाहून तिथे उपस्थिती असलेले सर्वच जण अवाक् झाले. या बसचं छत पूर्णपणे नाहीसं झालंय. फक्त सीट आणि उरलेला सांगडाचा बाहेर आला. या बसची अवस्था पाहून बसमधील प्रवाशांसोबत काय घडले असेल याचा विचार सुद्धा अंगावर शहारे आणणार आहे. आतापर्यंत फक्त एकच बसला बाहेर काढण्यात आलंय. दुसरी बस आणि इतर वाहनांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 26 जणांचे मृतदेह शोधण्यात आले आहे.

=======================================================================

संबंधित बातम्या

=======================================================================

दुर्घटनेला आम्हीच जबाबदार; नवा पूल 6 महिन्यांत बांधणार – नितीन गडकरी

 

महाड दुर्घटना : एसटी बसचे अवशेष सापडले, मृतांची संख्या 24 वर

महाड दुर्घटनेतील बसच्या शोधासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर – शिंदे

‘वाळू उपसा ‘महाड’ला जबाबदार’

मंत्रिमहोदयांना महाडदुर्घटनेची सकाळपर्यंत माहितीच नव्हती !

#महाडदुर्घटना असं सुरू आहे शोधकार्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 11, 2016, 6:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading