#‎महाडदुर्घटना‬: सावित्री नदीत बुडालेल्या एसटी बसचे अवशेष सापडले

#‎महाडदुर्घटना‬: सावित्री नदीत बुडालेल्या एसटी बसचे अवशेष सापडले

  • Share this:

mahad_help (9)

महाड - 11 ऑगस्ट :  महाडजवळ सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानं वाहून गेलेल्या दोन्ही एसटी बसचे अवशेष आज (गुरूवारी) तब्बल आठ दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर नौदलाच्या पथकाला सापडले आहेत. पुलापासून साधारण 200 मीटरच्या परिसरातच हे आवशेष गाळात रुतले आहेत. ते आता क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येतील.

तब्बल आठ दिवसांनंतर, नौदलाच्या डायव्हिंग टीमला बसचे दोन मोठे अवशेष सापडले आहेत. पुलापासून 200 मीटर अंतरावर, साधारण चार ते आठ मीटर खोल हे अवशेष रुतले असल्याची माहिती नौदलानं दिली आहे. या संदर्भात लगेचच एनडीआरएफला सूचना देण्यात आली असून क्रेन बोलावून हे अवशेष बाहेर काढण्याच्या हालचाली प्रशासनानं सुरू केल्या आहेत.

गेल्या मंगळवारी रात्री उशिरा सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन जीर्ण पूल कोसळला होता. या दुर्घटनेत कोकणातून मुंबईकडे येणार्‍या दोन एसटी आणि एक तवेरा गाडी सावित्री नदीत वाहून गेली होती. तसंच या दुर्घटनेत 42 जण वाहून गेल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. त्यांना शोधण्यासाठी तटरक्षक दल, नौदल, एनडीआरएफ आणि सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्नांची शर्थ केली होती. आत्तापर्यंत 26 प्रवाशांचे मृतदेह सापडले असून 14 जण बेपत्ता आहेत. त्यांचा आणि बेपत्ता एसटी बसचा शोध नौदल पथक, एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक प्रशासन घेतंय. त्यात त्यांना मोठं यश मिळालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 11, 2016, 1:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading