कांद्याचा वांदा होऊ नये यासाठी '50-50' तोडगा !

कांद्याचा वांदा होऊ नये यासाठी '50-50' तोडगा !

  • Share this:

gadakri_pawar10 ऑगस्ट : दिल्लीत कांद्याच्या हमीभावासंबंधी बैठकीत कोणताच ठोस निर्णय होऊ शकला नाही. हमीभावाबाबत राज्यानं केंद्राला प्रस्ताव पाठवावा, प्रस्ताव आल्यानंतर निर्णय घेऊ असं नितीन गडकरींनी सांगितलं. बाजारात उपलब्ध असलेला कांदा महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार 50 - 50 टक्के कांदा खरेदी करतील असं यावेळी नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मनमाडमध्ये पुन्हा पूर्वीच्याच पद्धतीनुसार लिलावाला सुरुवात झालीय. त्यामुळे गोणी लिलाव पद्धत अखेर बंद झालीये. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या विनंतीला मान देऊन व्यापार्‍यांनी हा निर्णय घेतला. पण कांद्याच्या पडलेल्या भावाबाबत मात्र शासकीय पातळीवर कोणत्याही ठोस उपाययोजना होऊ शकलेल्या नाहीत.

हमीभावाबाबत राज्यानं केंद्राला प्रस्ताव पाठवावा, प्रस्ताव आल्यानंतर निर्णय घेऊ असं नुसतंच कोरडं आश्वासन नितीन गडकरींनी दिलंय. राज्यात आणि इतर राज्यात कांद्याचे उत्पादनात वाढ झाल्याने कांद्याचे भाव घसरले आहेत,कांद्याचे उत्पादन खर्च देखील निघत नाही त्यामुळे कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 10, 2016, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading