महाड दुर्घटना :..तर 'ते' बेपत्ता मृत घोषित

  • Share this:

mahad_help (12)

10 ऑगस्ट : महाड दुर्घटनेचा आजचा आठवा दिवस आहे मात्र गेल्या चार दिवसांत एकही मृतदेह सापडला नाही. यामुळे बेपत्ता असलेल्यांचे नातेवाईक अस्वस्थ आहेत. दोन महिन्यांत जे मृतदेह सापडणार नाही त्यांना मृत घोषित करून कुटुंबियांना मदत दिली जाणार आहे.

या दुर्घटनेत जे प्रवासी एसटीमध्ये नव्हते त्यांना फक्त 5 लाख मदत जाहीर झाली होती. मात्र आता त्यांना 10 लाखांची मदत मिळणार आहे. एनडीआरएफकडून 4 लाख आणि सरकारकडून 6 लाख अशी एकूण 10 लाखांची मदत या प्रवाशांना मिळणार आहे. एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या मृतांना 10 लाखांची मदत जाहीर झाली आहे.

मात्र अजूनही शोधमोहीम थांबवलेली नाहीये. या परिसरात भयंकर प्रमाणात मगरी आहेत. त्यामुळे शोधकार्यात अडथळा येत आहे. या दुर्घटनेतल्या 42 प्रवाशांची यादी सरकारकडे आली आहे. याआधी होंडा सिटी गायब असल्याचं वृत्त होतं. मात्र होंडा सिटी गायब झालेली नाहीये अशी माहिती समोर येतीये. आतापर्यंत 20 मृतदेहांचा शोध लागू शकला. अजूनही शोधमोहिम सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2016 06:36 PM IST

ताज्या बातम्या