मुंबई विमानतळाजवळची 'ती' इमारत तोडून टाका, मुंबई हायकोर्टाचे आदेश

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2016 06:23 PM IST

मुंबई विमानतळाजवळची 'ती' इमारत तोडून टाका, मुंबई हायकोर्टाचे आदेश

mumbai_airport10 ऑगस्ट : मुंबई विमानतळाजवळ असलेली सांताक्रुज सुनिता हाउसिंग सोसायटी ही इमारत विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंगमध्ये अडथळा निर्माण करत असल्याने ती तोडून टाकावी, तसंच विकासकाविरोधात 48 तासांत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.

या इमारतीची विकासक कंपनी सायली कन्स्ट्रशन यांच्या मालकांविरोधात 48 तासांच्या आत एफआयआर नोंदवावा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे. यापूर्वी या विकासकावर कारवाई करण्याबाबत स्थगिती आदेश हायकोर्टाने दिले होते. पण आता कोर्टाने स्थगिती आदेश मागे घेतल्याने या इमारतीवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

विमानतळाच्या परिसरात उंच इमारतींमुळे विमान सेवेत बाधा येत असल्याने त्यावर कारवाई करण्याबाबत नागरी हवाई वाहतूक प्राधिकरण आणि मुंबई विमानतळ प्राधिकरणानं अशा विकासकांना 2012 पासून 100 पेक्षा जास्त नोटीसेस पाठवल्या आहेत. पण नेमकी काय कारवाई केलीत हे स्पष्ट करा असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2016 06:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...