नांदा सौख्यभरेच्या 'ललिता' आणि फुलराणीला लागले म्हाडाचे घर

नांदा सौख्यभरेच्या 'ललिता' आणि फुलराणीला लागले म्हाडाचे घर

  • Share this:

Mhada lottery21मुंबई - 10 ऑगस्ट : मुंबईत आपलं स्वत:चं घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. तशी ती कलाकारांचीही असते. त्यामुळे म्हाडाच्या घरासाठी लॉटरी निघते त्यावेळी सर्वसामान्यांबरोबर कलाकाराही अर्ज करतात.

यावेळी म्हाडाच्या घरासाठी ती फुलराणी फेम हेमांगी कवी, 'नांदा सौख्यभरे' फेम सुहास परांजपे, 'राधा ही बावरी' अभिनेत्री श्रुती मराठे, तसंच 'बँडीट क्वीन' फेम अभिनेत्री सीमा बिस्वास, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम तनुज महाशब्दे, मेघना एरंडे, रसिका आगाशे यांनी अर्ज केला होता. त्यापैकी हेमांगी कवी आणि सुहास परांजपे या दोन अभिनेत्रींचे भाग्य खुलले आहे.

हेमांगीने म्हाडाच्या घरासाठी यापूर्वी तब्बल सातवेळा अर्ज केला होता. अखेर आठव्या प्रयत्नात तिला यश मिळालं आहे. छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारल्यानंतर हेमांगी सध्या 'ती फुलराणी' या नाटकातून आपली छाप उमटवत आहे. तर 'झी मराठी'वरील 'नांदा सौख्यभरे' या मालिकेतील सासूच्या भूमिकेमुळे सुहास परांजपे सध्या चर्चेत आहेत. त्यांनी रंगवलेली खाष्ट सासू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

तर सैराट'मध्ये परशा आणि आर्चीला हैदराबादमध्ये आसरा देणार्‍या 'सुमन अक्का' अर्थात अभिनेत्री छाया कदम यांनाही मुंबईत म्हाडाचा 'आसरा' मिळाला आहे. सायन प्रतिक्षानगरमध्ये छाया कदमला घर मिळालं आहे.

मागच्यावर्षी म्हाडाच्या लॉटरीमध्ये टाईमपास फेम दगडू उर्फ प्रथमेश परब आणि अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना म्हाडाचे घर मिळाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2016 02:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading