मुंबईतील म्हाडाच्या 972 घरांची आज सोडतीला सुरूवात

Samruddha Bhambure | Updated On: Aug 10, 2016 10:03 AM IST

MHADA121

10 ऑगस्ट : मुंबईकरांच्या स्वप्नातलं घराची अर्थात म्हाडाची लॉटरी आज जाहीर होणार आहे. मुंबईत आज म्हाडाच्या 972 घरांची सोडत निघणार आहे. या सोडतीकडे मुंबईत स्वतःचं घर असावं, असं स्वप्न उराशी बाळगून अर्ज केलेल्या अर्जदारांचे डोळे लागले आहेत.

972 घरांसाठी तब्बल 1 लाख 36 हजार 577 अर्ज म्हाडाकडे आले आहेत. म्हणजेच प्रत्येक घरामागे 140 अर्ज प्राप्त झालेत. वांद्रे इथल्या रंगशारदा हॉलमध्ये सकाळी 9 वाजता घरांची सोडत निघणार आहे. बोरीवली, दहीसर, गोरेगाव, मालाड, मानखुर्द, चेंबूर, कुर्ला आणि पवई इथल्या घरांसाठी ही लॉटरी आहे. त्यामुळे सोडतीत कोणाचं नशीब चमकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

दरम्यान, म्हाडाच्या घरांसाठी यावर्षीही अनेक कलाकारांनीही अर्ज केले आहेत. ज्यात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम सिमा बिस्वास, 'राधा ही बावरी'मधली श्रुती मराठे, 'ती फुलराणी' फेम हेमांगी कवी, यांच्यासह तनुज महाशब्दे, शैला काणेकर, मेघना एरंडे, रसिका आगाशे यांचा समावेश आहे. या कलाकारांनी पवई, प्रतीक्षा नगर, गोरेगाव, जुने मागाठाणे इथल्या घरासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता सर्वांचे निकालाकडे लक्ष लागले आहे.

सोडतीच्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण http://mhada.ucast.in या वेबसाइटवर 'वेबकास्टिंग'च्या माध्यमातून पाहण्याची सुविधाही असेल.

म्हाडा पहिली सदनिका विजेता सिद्धार्थ नगर गोरेगांव- 322 संकेत क्रमांक - कमलेश चौहान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2016 08:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close