IBN लोकमत इम्पॅक्ट : महसूल विभागाकडे असलेल्या वनजमिनी वनविभाग घेणार ताब्यात

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2016 07:32 PM IST

Vanavibhag ghaotala

09 आॅगस्ट : महसूल विभागाकडे असलेलं वनक्षेत्र 31 डिसेंबर 2016 पर्यंत वन विभागाकडे हस्तांतरीत करा, असे आदेश वन खात्याचे सचिव विकास खरगे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. महसूल विभागाकडे असलेलं वनक्षेत्र हे वेगवेगळ्या कारणांसाठी वापरलं जातंय याची बातमी सर्वातप्रथम आयबीएन लोकमतनं दाखवली होती.

महसूल विभागाच्या ताब्यातील जमीन वन विभागाला परत करण्यासंदर्भात 1976 पासून पत्रव्यवहार सुरू आहे. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. 2000-2001 या काळात स्मरणपत्रंही देण्यात आली. चाळीस वर्षाच्या कालावधीत यात प्रगती झाली नाही. आजही वनविभागाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात महसूलच्या ताब्यात आहेत. महसूल विभागाने या जमिनीच परस्पर विविध प्रयोजनांसाठी वाटप केलं आहे. या जमिनींच्या आढाव्यासाठी दर महिन्याला महसूल आणि वन विभागाची बैठक घ्या असेही आदेश आता वन सचिवांनी दिलेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2016 07:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...