S M L

सासूकडून सुन आणि तिच्या आईचा खून

Samruddha Bhambure | Updated On: Aug 9, 2016 11:05 AM IST

 crime

ठाणे - 08 ऑगस्ट : ठाण्यातील मुंब्रा इथल्या शिमला पार्कमध्ये एका सासूने सुनेसह तिच्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. सासूने दोघींची गळा कापून हत्ये केली. याप्रकरणी पोलिसांनी सासूला अटक केली आहे.

सासूने सून आणि तिच्या आईला शीत पेयातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर दोघींची गळा कापून हत्या केली. हत्येचे कारण कौटुंबिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या सुनेची हत्या झाली आहे तिला अवघ्या 40 दिवसांचे बाळ आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी सासूला अट केली असून या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासूकडून सुनेचा हुंड्यासाठी छळ केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2016 11:05 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close