मुंबई एन्ट्री पॉईंटवर कोट्यवधींची लूट

मुंबई एन्ट्री पॉईंटवर कोट्यवधींची लूट

  • Share this:

344979-mumbai700

09 ऑगस्ट : मुंबईकरांची एमईपी टोल कंपनीकडून गेल्या 6 वर्षांपासून लूट सुरू आहे.

मुंबईतल्या एंट्री पॉईंटवरील टोल नाक्यांवर टोल वसुलीचं कंत्राट 16 वर्षांपूर्वी एमईपी कंपनीला देण्यात आलं होतं. या प्रकल्पाची किंमत 2100 कोटी रुपये होतीय. याचा मोबदला म्हणून एमईपी कंपनीला पेट्रोल वर एक टक्का तर डिझेलवर 3 टक्के अधिभार मिळत होता.

यातून एमईपी कंपनीचे एकवीसशे कोटी रुपये 2010 मध्येच वसूल झाले. तरीही गेल्या 6 वर्षांपासून मुंबईकरांच्या खिशावर एमईपी डल्ला मारत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे एमईपीची ही टोलधाड बंद करा अशी शिफारस कॅगनं राज्य सरकारला केली होती. तरीही याकडं कानाडोळा केला जातोय. त्यामुळं आतातरी ही टोलधाड बंद होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कशी होतेय मुंबईकरांची लूट?

  •  mep टोल कंपनीला जानेवारी 2000पासून पेट्रोलवर 1 टक्का तर डिझेलवर 3 टक्के उपकर दिला जातो
  • mepच्या प्रकल्पाची किंमत 2 हजार 100 कोटी होती ही किंमत 2010 मध्येच वसूल झाली
  • 6 वर्षांपासून मुंबईत mepची बेकायदा टोल वसुली
  • 2015मध्ये बेकायदा टोल वसुली बंद करण्याची कॅगची शिफारस

कशी सुरु झाली मुंबईत टोलधाड ?

  • युती सरकारच्या काळात मुंबईत 56 उड्डाणपूल बांधले
  • उड्डाणपुलाच्या खर्चाच्या वसुलीसाठी एंट्री पॉईंट टोल
  • मुलुंड पूर्व, मुलुंड पश्चिम, ऐरोली, वाशी, दहिसर
  • दररोज सरासरी 2 लाख 90 हजार वाहनं टोल भरतात
  • दररोज सरासरी 1 कोटी 30लाख 15 हजार 320 रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2016 09:26 AM IST

ताज्या बातम्या