महाड दुर्घटना : सहाव्या दिवशी एकही मृतदेहाचा शोध नाही

Sachin Salve | Updated On: Aug 8, 2016 09:35 PM IST

mahad_day_2_new08 ऑगस्ट : महाड दुर्घटनेच्या आजच्या सहाव्या दिवशी ना एकाही मृतदेहाचा शोध लागलाय ना वाहनाचा सुगावा. एवढ्या यंत्रणा वापरूनही आत्तापर्यंत फक्त 26 मृतदेह हाती आले आहे. त्यामुळे या दुर्घटनेत जीव गमवावा लागलेल्या मृतांचे दु:खी नातेवाईक संतप्त झाले आहेत.

दुसरीकडे घटनास्थळी रोज मंत्र्यांचे दौरे सुरू असून सावित्रीच्या पात्रात फेरफटका मारताना फोटो काढून घेणं महत्वाचं वाटतंय. आजही पर्यावरण मंत्री रामदास कदम गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि माणिकराव ठाकरे यानी घटनास्थळी हजेरी लावली. या मंत्र्यांच्या दौर्‍यामुळे पोलीस आणि सरकारी कर्मचार्‍यानाही काम टाकून मंत्र्याना माहिती देण्यात फिराव लागतंय.

दरम्यान, महाडमध्ये सुरू असलेल्या शोधकार्यात मगरींचा मोठा धोका निर्माण झालाय. मगरींना पांगवण्यासाठी पाण्यात कमी क्षमतेचे स्फोट केले जातायत. सावित्री नदीचा पूर ओसरलेला असला तरीही मृतदेहांचा शोध घेणं हे एक आव्हान बनलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2016 09:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close