जीएसटी पास झाल्यावर बघू, मुंबईच्या महापौरांनी तोडले अकलेचे तारे

जीएसटी पास झाल्यावर बघू, मुंबईच्या महापौरांनी तोडले अकलेचे तारे

  • Share this:

snehal_ambekarमुंबई, 08 ऑगस्ट : मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर त्यांच्या वक्तव्यानं अनेकदा वादात सापडल्यात. आताही पुन्हा त्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. मुंबईत जीएसटीला आमचा विरोध आहे, राज्यसभेत जीएसटी मंजूर झालेलं नाही, ते पास होईल तेव्हा बघू असं वक्तव्यचं आंबेकर यांनी दिली. विशेष म्हणजे जीएसटी विधेयक राज्यसभेत मंजूर झालेलं आहे, ही माहिती पत्रकारांनीच त्यांना दिल्यावर समजली.

मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा अडचणीत सापडल्या यावेळी मुद्दा आहे तो जीएस्टीचा. मुंबईत जीएसस्टीला आमचा विरोध आहे असं सांगत असताना, महापौर स्नेहल आंबेकर यांनी जे विधेयक अजून राज्यसभेत मंजूर झालं नाही. ते पास होईल त्यावेळी बघू असं उत्तर त्यांनी दिलं आहे. तुमच्या सदस्यांनी विरोध केला पण मतदान मात्र विरोधात केलं नाही असं पत्रकारांनी लक्षात आणून  दिल्यावरही महापौरांना विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्याचा साक्षात्कार झाला नाही हे मात्र विशेष.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 8, 2016, 7:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading