आता हिंगोली!, आयसिस संशयित शिक्षक एटीएसच्या ताब्यात

आता हिंगोली!, आयसिस संशयित शिक्षक एटीएसच्या ताब्यात

  • Share this:

hingoli_4408 ऑगस्ट : परभणीपाठोपाठ आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन एटीएसनं हिंगोलीतून एका प्राथमिक शिक्षकाला ताब्यात घेतलंय. रईसुद्दीन सिद्दीकी असं या शिक्षकाचं नाव आहे. आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन त्याला ताब्यात घेण्यात आलंय. रईसुद्दीन हिंगोलीच्या आझम कॉलनीत राहतो. गेल्या 3 वर्षांपासून तो औंढा नागनाथच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवत होता. एटीएसनं त्याला ताब्यात घेतल्यानं खळबळ माजली आहे.

रईसोद्दीन सिद्दीकी हा हिंगोली जिल्हा परिषद मधील उर्दू माध्यमात शिक्षक म्हणून मागील 3 वर्षांपासून कार्यरत आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील जिल्हा परिषद शाळेत रईसोद्दीन सिद्दीकी हा कार्यरत होता एटीएसच्या कारवाईने हिंगोली येथे खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी रईसोद्दीन सिद्दीकी हा हिंगोली येथील आझम कोळीणी येथे भाड्याने राहत होता. हिंगोली येथे कमी आणि परभणी येथे घर

असल्यामुळे जास्त परभणी येथे राहत असल्याची प्रतिक्रिया रईसोद्दीन सिद्दीकीच्या हिंगोली येथील घर मालक शेख सलीम यांनी दिली.

आयसिस शी संबंध असणारा रईसोद्दीन सिद्दीकी हा शाळेत असताना सज्जनतेने वागायचं,शाळेच्या वेळेत काम करायचा अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्याप दिनेश गुप्ता यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 8, 2016, 5:58 PM IST

ताज्या बातम्या