अमित कुरणेला पोलीस स्टेशनमध्येच मनसेकडून 'खळ्ळ खट्याक'

अमित कुरणेला पोलीस स्टेशनमध्येच मनसेकडून 'खळ्ळ खट्याक'

  • Share this:

सांगली, 08 ऑगस्ट : मिरजमधील बलात्कार प्रकरणातला आरोपी अमित कुरणे आणि त्याच्या आईवडिलांवर पोलीस ठाण्याच्या आवारात हल्ला करण्यात आला. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी अमित कुरणेला 'खळ्ळ खट्याक' देत मारहाण केली. शिवाय त्याचा शर्टही फाडला.amit_kurne

बलात्कार पीडित महिलेच्या आत्महत्येनंतर फरार झालेल्या अमितला मुंबईत पकडण्यात आलं. तर त्याची आई सुनीता आणि वडील अण्णासाहेब याला कराडमधून पकडण्यात आलं. त्या तिघांना मिरजमध्ये आणण्यात आलं. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. अमितला पोलिसांनी गाडीतून उतरवल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला पोलीस ठाण्यात नेलं.

अमित कुरणे ताब्यात

सांगलीतल्या मिरज बलात्कार प्रकरणातला आरोपी अमित कुरणे याला मंुबईतून तर त्याच्या आईवडिलांना कराडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे. बलात्कार पीडित महिलेचा छळ केल्याचा या तिघावर आरोप आहे. अमित कुरणे यानं महिन्यापूर्वी महिलेवर बलात्कार केला होता. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पण पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. उलट या प्रकरणात पीडित महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. कुरणे कुटुंबीयांचा छळ आणि पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळं त्रस्त महिलेनं कुरणेच्या शेतातल्या घरात आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिनं भिंतीवर अमित कुरणेचं नाव लिहलं होतं.

नराधम अमित कुरणेची कुंडली

अमित बारावीपर्यंत शिकला, इंजिनिअरिंगचा डिप्लोमा अर्धवट सोडला

 2012-13मध्ये आंतरजातीय लग्न, छळाचा आरोप करीत बायकोकडून कोर्टात खटला

 स्थानिक काँग्रेस नेते महादेव कुरणे यांचा पुतण्या

 अमित कुरणे युवा मंचचा स्वयंघोषित अध्यक्ष

 अमितचे वडील लिंगायत समाजाचे नेते

 वडील स्थानिक अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष

 वडील शिंदे साखर कारखान्याचे संचालक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 8, 2016, 4:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading