News18 Lokmat

अशी 'रिवर क्रॉसिंग'बंद करा नाहीतर गुन्हे दाखल करू, मग गावकर्‍यांनी जायचं कसं ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2016 02:45 PM IST

अशी 'रिवर क्रॉसिंग'बंद करा नाहीतर गुन्हे दाखल करू, मग गावकर्‍यांनी जायचं कसं ?

07 ऑगस्ट : सरकारी यंत्रणा म्हणजे 'भीक नको पण कुत्र आवर' असं म्हणण्याची वेळ जुन्नरमधील आंबेगव्हाणच्या गावकर्‍यांवर आलीये. गावकर्‍यांनी पूल नसल्याने नदीवर सुरू केलेला तारेचा पाळणा काढून टाकण्याच्या सूचना गावकर्‍यांना दिल्यात. अशी वाहतूक सुरू ठेवल्यास गावकर्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची धमकीही देण्यात आलीये.

गावकरी आणि शाळकरी लोकं या नदीवर बांधलेल्या तारेच्या पुलावरुन जिवघेणा प्रवास करीत होते.आयबीएन लोकमतनं ही बातमी

दाखवल्यानंतर गावकर्‍यांचा प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांचा प्रश्न बिकट करुन टाकलाय. आता गावातल्या लोकांनी गावाबाहेर जायचं कसं आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं कसं असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2016 02:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...