News18 Lokmat

महाडदुर्घटनेत 42 हुन अधिक बेपत्ता ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2016 09:17 PM IST

mahad_help (12)07 आॅगस्ट : महाड दुर्घटनेच्या शोधमोहिमेचा आजचा पाचवा दिवस आहे. आतापर्यंत 26 मृतदेह सापडले आहेत. दुर्घटनेत सापडलेल्या बसमधील प्रवाशांची संख्या 32 असल्याची माहिती समोर येतेय. आतापर्यंत बेपत्ता बसमधील 22 प्रवाशांचे मृतदेह सापडले आहे. पण या 22 प्रवाशांव्यतिरिक्त आणखी 10 प्रवासी या बसमधून प्रवास करीत असल्याची माहिती समोर आलीये.

10 एसटी प्रवाशांची नावं आयबीएन लोकमतच्‌्या हाती लागलीये. महाड दुर्घटनेत 42 प्रवासी बेपत्ता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. मात्र हा आकडा आणखी जास्त असल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. आतापर्यंत एकूण 26 मृतदेह हाती लागले आहेत. शोधमोहिमेत मृतदेह हाती लागत असले तरी एकाही वाहनाचा शोध लागलेला नाही. कालपासून वाहनांचा शोध घेण्यासाठी विशेष कॅमेरे लावलेल्या तीन बोटी शोध घेत आहेत. मात्र अजून एकाही वाहनाचा सुगावा लागलेला नाही.

एसटीतले 10 बेपत्ता प्रवासी

1) गोरखनाथ सीताराम मुंढे, राजापूर- बोरिवली बसचे चालक

Loading...

2)विश्वास काशिनाथ देसाई, जयगड- मुंबई बसचे वाहक

3) जयेश गोपाल बाने, राजापूर- बोरिवली बसचे प्रवासी

4) गोविंद सखाराम जाधव, राजापूर- बोरिवली बसचे प्रवासी

5) इस्माईल बाघू,राजापूर- बोरिवली बसचे प्रवासी

6) अनंत विठ्ठल मोंडे, राजापूर- बोरिवली बसचे प्रवासी

7) गणेश कृष्णा चव्हाण, राजापूर- बोरिवली बसचे प्रवासी

8) राजेश कळमकर, राजापूर- बोरिवली बसचे प्रवासी

9) धोंडू बाबाजी कोकरे, जयगड- मुंबई बसचे प्रवासी

10) जितेश जैतापकर, जयगड- मुंबई बसचे प्रवासी

दरम्यान, एनडीआरएफ बरोबरच समुद्र किनार्‍यंावर स्थानिक ग्रामसुरक्षादलही शोध मोहिमेत सक्रीय आहे. सकाळी सात वाजताच या दलानं स्थानिक नागरिकांच्या मदतीनं आपल्या कामाला सुरूवात केलीय. आंजर्ले, केळशी, वेळास, बाणकोट, समुद्र किनारर्‍यावर ही मोहिम सुरू आहे. तर बाणकोट खाडीत स्थानिक पोलीस मच्छिमार बोटीतून मृतदेहांचा शोध घेत आहेत. समुद्र आणि खाडीतून वाहून जाणारे मृतदेह शोधणं आणि ते प्रशासनाच्या हवाली करण्याचं महत्वाचं काम हे स्थानिक नागरिक आणि पोलीस करत आहे.

=======================================================================

संबंधित बातम्या

=======================================================================

दुर्घटनेला आम्हीच जबाबदार; नवा पूल 6 महिन्यांत बांधणार – नितीन गडकरी

 

महाड दुर्घटना : एसटी बसचे अवशेष सापडले, मृतांची संख्या 24 वर

महाड दुर्घटनेतील बसच्या शोधासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर – शिंदे

‘वाळू उपसा ‘महाड’ला जबाबदार’

मंत्रिमहोदयांना महाडदुर्घटनेची सकाळपर्यंत माहितीच नव्हती !

#महाडदुर्घटना असं सुरू आहे शोधकार्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2016 09:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...