भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 8 वर

भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 8 वर

  • Share this:

bhiwandi3307 ऑगस्ट : : भिवंडीतल्या हनुमान टेकडी भागात दुमजली इमारत कोसळून झालेल्या दृर्घटनेत मृतांचा आकडा आता 5 वर पोहचला आहे. इमारतीच्या ढिगार्‍याखालून संध्याकापर्यंत  8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. अजूनही शोधकार्य सुरू असून काही जण अडकल्याची भीत आहे.

हनुमान टेकडीकडे जाणार्‍या रोडवर विनोद सायझिंगच्या बाजूला ही महादेव इमारत 35 वर्षं जुनी होती. या इमारतीत दोन ते तीन कुटुंब राहत होती. या कुटुंबातले इतर सदस्य कोसळलेल्या इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेत. इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. भिवंडी फायर ब्रिगेडसह आता एनडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झालीये. एनडीआरएफची टीम आल्यानं बचावकार्याला वेग आलाय. दोन मजल्याची ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत होती. आज सकाळी दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यांची नावे सज्जनलाल महादेव गुप्ता ( 60) आणि त्यांची पत्नी सत्यवती सज्जनलाल गुप्ता अशी आहेत. रमजान आली अहमद हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सज्जनलाल हे या इमारतीचे मालक होते आणि पालिकेने दोन वेळेस त्यांना नोटीस दिली होती.

आठवड्याभरापुर्वीच भिवंडीतील गैबी नगर परिसरातील एक जीर्ण इमारत कोसळून 8 जण मृत्युमुखी पडले होते. त्या इमारतीलाही अतिधोकादायक ठरवून पालिकेने रिकामी करण्याची नोटीस दिली होती. दोन दिवसांपूर्वी इमारतीचा पाणीपुरवठाही बंद करण्यात आला होता. इमारत सोडल्यास आपला हक्क जाईल या भीतीपोटी अनेक भाडेकरु धोकादायक इमारतीत राहतात धोका पत्करतात त्यामुळे अशा भाडेकरूंना रहिवासी प्रमाणपत्र मिळाले तर पुढे पुनर्विकासाच्या वेळी त्यांचा भाडेकरु म्हणून कायद्याने दिलेला हक्क अबाधित राहील यासाठी भिवंडी पालिकेला तशी सुचना केली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

दरम्यान, भिवंडीतील 17 अतिधोकादायक इमारतींपैकी 7 इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले असून इतर इमारतींतील रहिवाशांना बाहेर हलविण्याची कारवाई तातडीने पूर्ण करण्यात येईल असे ई रविंद्रन यांनी यावेळी सांगितलं.

भिवंडीमधील ढिगार्‍याखालील अडकलेल्या कुटुंबाची नावं

धनीराम ठाकूर वय 45

रेखा ठाकूर 38

शिवानी ठाकूर 13

देवेश ठाकूर 9

मैफिक ठाकूर साडे तीन

सोममणी ठाकूर 60 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 7, 2016, 6:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading