दुर्घटनेला आम्हीच जबाबदार; नवा पूल 6 महिन्यांत बांधणार - नितीन गडकरी

दुर्घटनेला आम्हीच जबाबदार; नवा पूल 6 महिन्यांत बांधणार - नितीन गडकरी

  • Share this:

nitin_gadkari

06 ऑगस्ट : 'महाडमध्ये घडलेली दुर्घटना ही सरकार म्हणून सर्वस्वी आमची जबाबदारी असल्याचं सांगत सावित्री नदीवरील दुर्घटनाग्रस्त पूल अवघ्या 180 दिवसांत पुन्हा बांधून देऊ,' अशी ग्वाही केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

महाड दुर्घटनेवरून विधीमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं होतं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवारी) दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून आरोप-प्रत्यारोपाच्या या राजकारणावर पडदा टाकला. 'महाड इथल्या पुलाच्या कामासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. या कामाच्या निविदा लवकरात लवकर काढून सहा महिन्यांत नवा पूल उभा करू,' असं गडकरी यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 6, 2016, 6:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading