महाड दुर्घटनेतील बसच्या शोधासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर - शिंदे

महाड दुर्घटनेतील बसच्या शोधासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर - शिंदे

  • Share this:

442518-eknath-shinde

महाड - 06 ऑगस्ट : महाड इथल्या दुघर्टनेचा आज (शनिवारी) चौथा दिवस असून, अद्याप पूरात वाहून गेलेले एकही वाहन सापडले नाही. त्यामुळे बेपत्ता वाहनांच्या शोधासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सावित्री नदीला आलेल्या पूरात 2 एसटी बस आणि अनेक छोटी वाहने वाहून गेले आहेत. मात्र, या घटनेला आज चार दिवस उलटूनही वाहने अद्याप मिळाले नाहीत. एडीआरएफचय जवानांनी युद्धपातळीवर वाहनांची शोध घेत आहेत. यात यश न आल्याने शोध कार्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

शिंदे म्हणाले, वापरण्यात येणारा नवीन तंत्रज्ञान हे अमेरिकेवरून मागवण्यात येणार आहे. तसंच बोटींना 3 कॅमेरे बसवण्यात येणार आहे. या कॅमेराच्या माध्यमातून 700 फूट खोल आणि 400 फूट रुंद पाण्याखालचं चित्रीकरण करून त्यावरून वाहनांचा शोध घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 6, 2016, 2:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading