S M L

रिओ ऑलिम्पिकची शानदार सुरुवात, अभिनव बिंद्राने केलं भारतीय पथकाचे नेतृत्त्व

Samruddha Bhambure | Updated On: Aug 6, 2016 01:58 PM IST

रिओ ऑलिम्पिकची शानदार सुरुवात, अभिनव बिंद्राने केलं भारतीय पथकाचे नेतृत्त्व

06 ऑगस्ट : ब्राझीलच्या रिओ दी जानेरो इथे ऐतिहासिक माराकाना स्टेडियमवर 31 व्या ऑलिम्पिक स्पर्धेची दिमाखात सुरुवात झाली आहे. भव्यदिव्य उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर अधिकृतपणे स्पर्धेला सुरुवात झाली आहे. तब्बल 75 हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला.

जगभरातील तब्बल 10 हजारांहून अधिक खेळाडू रिओ 2016 ऑलिम्पिक स्पर्धेत आपले नशीब आजमवणार आहेत. ऍथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, जलतरण, नेमबाजी, तिरंदाजी, बॅडमिंटन, टेनिस, गोल्फ आदी क्रीडाप्रकारांत डोळे विस्फारणारी कामगिरी करण्यासाठी अनेक खेळाडू जिवाची बाजी लावतील. भारताकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक दाखल झाले आहे. भारताचे एकूण 119 खेळाडू विविध खेळांसाठी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले आहेत.रिओतील माराकाना स्टेडियमवर रंगलेल्या दिमाखदार ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात ब्राझीलच्या संस्कृतीचे विशाल दर्शन घडले. सोहळ्याला देण्यात आलेला थ्रीडी इफेक्टमुळे उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणं फिटलं. चार तास चाललेल्या या रंगारंग सोहळ्यात ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राच्या नेतृत्वाखाली भारतीय चमू स्टेडियमवर अवतरला. जागतिक टेनिस क्रमवारीत नंबर वन राहिलेला ब्राझीलचा माजी खेळाडू गुस्तावो कर्टेन याला ऑलिम्पिक मशाल प्रज्वलित करण्याचा मान मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2016 01:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close