१ मेपर्यंत संपूर्ण मुंबईत वायफाय सुविधा, मुख्यमंत्र्यांची घोषणा

  • Share this:

 मुंबई, 5 ऑगस्ट : मुंबईला स्मार्ट सिटी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून 1 मे 2017 पर्यंत संपूर्ण मुंबईत वाय-फाय सेवा सुरू करण्यात येईल. परवडणारी घरे बांधण्यासाठी 2100 हेक्टर जमीन उपलब्ध करुन त्यावर 10 लाख घरे बांधण्याचे नियोजन करण्यात येणार असून मुंबई शहराबरोबरच उपनगरांमध्ये समूह विकास योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.cm devendra fadanvis4

मुंबई शहर हे वायफाय शहर बनवण्याच्या दृष्टीने वेगाने हालचाली सुरू असून विविध ठिकाणी एकूण 1200 वायफाय हॉटस्पॉटच्या माध्यमातून हे काम होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी सांगितले. 500 वायफाय हॉटस्पॉट हे येत्या 1 नोव्हेंबरपर्यंत बसवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तर मे 2017 पर्यंत सर्व 1200 हॉटस्पॉट बसवण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले. या वायफायचा नागरी सुविधांमध्ये मोठा फायदा होणार असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

तसंच सुरक्षेच्या दृष्टीने शहरभर सीसीटीव्ही बसवण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. मुंबई हे वेगाने कॉक्रीटचे जंगल बनत असल्याची चिंता व्यक्त करत अशा परिस्थितीत सर्वसामान्यांसाठी परवडणार्‍या घरांची योजना राबवण्याचा विचार शासन गांभीर्याने करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबईत 2100 हेक्टर जमिनीवर सर्वसामान्यांना परवडतील अशी सुमारे दहा लाखांहून अधिक घरे बांधण्याचा विचार चालू आहे तर 658 हेक्टरमध्ये असलेला झोपडपट्टी भाग पुनर्वसन योजनांतर्गत विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं सांगत मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शासन गांभीर्याने पावले उचलत असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 5, 2016, 11:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading