'त्या' पुलाबद्दल चंद्रकांत पाटलांकडून दिशाभूल ?

'त्या' पुलाबद्दल चंद्रकांत पाटलांकडून दिशाभूल ?

  • Share this:

05 ऑगस्ट : महाडमध्ये सावित्री नदीवरचा पूल दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर राज्य सरकारनं आता सर्व ब्रिटिशकालीन पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याचं जाहीर केलंय. पण हाच पूल सुरक्षित असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिला होता. या उत्तराची प्रत आमच्या हाती लागली आहे.chandrakant_patil

महाडचे आमदार भरत गोगावले यांनी 30 जुलै 2015 विधानसभेत प्रश्न विचारला होता. त्यावर हा पूल सुरक्षित असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी अगदी ठामपणे सांगितलं होतं. त्यामुळे अशी चुकीची माहिती सभागृहाला देऊन सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी सभागृहाची दिशाभूल केली नाही का असा प्रश्न आता विचारला जातोय. विशेष म्हणजे महाडच्या दुर्घटनेनंतरही चंद्रकांत पाटील यांनी मे महिन्यात या पुलाचं ऑडिट केलं होतं पण पूल कसा पडला असं आश्चर्यच व्यक्त केलं होतं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर महाड दुर्घटनेप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केलीये.

भरत गोगावलेंचा प्रश्न

मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय?

1. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री पुलाच्या बांधकामाला वृक्षांचा वेढा बसला असून या झाडांची मुळे ही पुलांच्या बांधकामाच्या आत खोलवर गेल्यामुळे त्या पुलाला धोका निर्माण झाल्याचे नुकतेच मे 2015 मध्ये किंवा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय?

2. असल्यास, हा पूल कोणत्याही क्षणी ऐन पावसाळ्यात कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय?

3. असल्यास, या पुलाची शासनाने पाहणी केली आहे काय आणि त्यात काय आढळून आले?

चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे उत्तर

"मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरच्या 129 ते 400 किलोमीटर अंतरादरम्यान सावित्री नदीवर ब्रिटिशकालीन मोठा पूल आहे. या पुलाच्या सांधेजोडामध्ये काही किरकोळ स्वरूपात झाडे उगवलेली आढळली. ती झाडे पुलाला हानी न पोहोचता मुळासकट काढून टाकण्यात आली आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर नियमित पाहणीत अशी झाडे पुलाला हानी न पोहोचवता काढून टाकण्यात येतात. हा पूल तांत्रिकदृष्ट्या सक्षम असून त्यावरून वाहनांची वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे."chantrakant_patil_letter

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 5, 2016, 9:54 PM IST

ताज्या बातम्या