राज्य सरकारची माघारी, अखेर 'नो हेल्मेट नो पेट्रोल'चा निर्णय मागे

राज्य सरकारची माघारी, अखेर 'नो हेल्मेट नो पेट्रोल'चा निर्णय मागे

  • Share this:

no_helmetमुंबई, 05 ऑगस्ट : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोठा गाजावाजा करत 'नो हेल्मेट नो पेट्रोल' अशी घोषणा केली होती. मात्र, वाढत्या विरोधामुळे अखेर हा निर्णय मागे घ्यावा लागलाय. रावते यांनी विधानसभेत 'नो हेल्मेट नो पेट्रोल' निर्णय मागे घेतलाय. मात्र, हा निर्णय मागे घेत असताना पेट्रोल पंपचालकांना हेल्मेट नसणार्‍या गाडीचा नंबर आरटीओला कळवणं बंधनकारक असणार आहे.

हेल्मेट सक्ती राबवण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेट नसले तर पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही अशी अभिनव घोषणा केली. या निर्णयाची 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी होणार होती. मात्र, पुणेकर आणि पेट्रोल पंपचालकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. पेट्रोल पंपचालकांनी 1 ऑगस्टपासून राज्यव्यापी संपाचा इशाराही दिला होता. तर विरोधी पक्षांनी हेल्मेट सक्ती राबवावी पण असा निर्णय घेऊ नये असं सांगत विरोध केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रावतेंशी चर्चा करून नो हेल्मेट नो पेट्रोल निर्णयावर मध्यममार्ग काढण्याचं आश्वासन दिलं होतं. अखेरीस आज परिवहन मंत्र्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर हेल्मेट जरी नसले तरी पेट्रोल मिळणार आहे. पण, असं जरी असलं तरी सुद्धा हेल्मेट नसणार्‍या गाडीचा नंबर आरटीओला कळवणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे पेट्रोल पंप चालक या निर्णयावर काय भूमिका घेता हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 5, 2016, 4:59 PM IST

ताज्या बातम्या