News18 Lokmat

मुंबईत मुसळधार पाऊस; मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2016 03:49 PM IST

मुंबईत मुसळधार पाऊस; मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

Water bloging213

05 ऑगस्ट :  मुंबईत पावसाने आज (शुक्रवारी) सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. तर मध्य रेल्वेच्या सायन-कुर्ला, घाटकोपर, मशीद रेल्वे मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. आता ती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हार्बर मार्गावरही पाणी साचल्याने गाड्या अर्धा तास उशिराने धावत आहेत. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक मंदावली असून मुंबईतील अनेक रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.

मुंबईत सकाळपासून कोसळणार्‍या पावसामुळे खबरदारी म्हणून अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील दादर, परळ, आणि वरळीत पावसाचा जोर वाढला आहे. बोरिवली, कांदीवली, अंधेरी वांद्रेसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.

मुंबईतील मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक उशिराने धावत आहे. कल्याणजवळ आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे. अनेक स्थानकांवर प्रवाशांनी मोठी गर्दी केली. हार्बर रेल्वे मार्गाला तसेच ट्रान्सहार्बर रेल्वेलाही पावासाचा फटका बसला आहे.

दरम्यान, येत्या 48 तासांत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे ऑफिसमधून घरी जाणार्‍या मुंबईकरांना पावसाच्या पाण्यातून मार्ग काढत जावं लागणार आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2016 11:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...