News18 Lokmat

#महाडदुर्घटना : आजचं शोधकार्य थांबवलं, 22 मृतदेह सापडले

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2016 07:34 PM IST

mahad_help (9)05 आॅगस्ट : महाड दुर्घटनाचा आजचा 3 दिवस...आतापर्यंत 22 मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आलेलं आहे.आणखी बेपत्ता लोकांचा शोध सुरूच आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे नदीत पाण्याची पातळी वाढला आहे. त्यामुळे आजचं शोधकार्य थांबवण्यात आलंय.दरम्यान, पुरात वाहून गेलेल्या दोन एसटी बस आणि अन्य वाहनांचा 60 तासाहून जास्त काळ उलटून गेले तरीही कोणताच थांगपत्ता लागू शकलेला नाही.

काल दिवसभर पाऊस कमी असल्यामुळे 14 मृतदेह सापडले. आज मात्र मुसळधार पावसामुळे आणि सावित्री नदी पातळी वाढल्याने बचाव कार्य धाबवण्यात आलं. मात्र सकाळच्या सुरुवातीच्या काळात 6 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. आज दिवसभर पावसामुळे नेव्ही, कोस गार्ड, वायूसेनेने शोध मोहिम धांबवण्यात आली.

 मच्छिमार आले धावून

महाड दुर्घटनेच्या तिसर्‍या दिवशीची शोध मोहिम संपली असली तरी एकाही अपघातग्रस्त वाहनाचा शोध लावण्यात एनडीआरएफ आणि नेव्हीच्या शोध पथकाना यश आलेल नाही. वाहन शोधण्याच्या मोहिमेत रेवस मधल्या मच्छिमारांनी आपल्या बोटींचे फिश फाईंडर काढून आणले आणि त्यानी अपघात स्थळापासून अडीच किलोमीटरचा परिसर तपासला मात्र त्याना पुढे नेऊन आणण्यात आलं नाही.

Loading...

आज दिवसभरातील अपडेट्स

 • आज सकाळपासून सहा मृतदेह सापडले
 •  आतापर्यंत 21 जणांचे मृतदेह सापडले, 11 जणांचा शोध सुरू
 • आंबेत खाडीजवळ आणखी तीन मृतदेह आढळले, मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू
 • सकाळपासून महाड, दापोलीत मुसळधार पाऊस, शोधकार्यात अडथळा
 • नेव्हीचे स्कुबा डायवर्स, डॉगस्क्वॉडही शोध मोहिमेत सहभागी
 • स्थानिक कोळी बांधवांच्या होड्या शोध मोहीमेत सहभागी
 • नौदलाच्या दोन जेमिनी बोट्स, 16 डायव्हर्स, दोन अधिकार्‍यांसह 19 मार्को घटनास्थळी
 • सरकारी माहितीनुसार एकून 42 जण बेपत्ता, 2 एसटी बस, तवेरा, होंडा सिटी या गाड्यांचा शोध सुरू
 • काल घटनास्थळापासून 5 कि.मी. अंतरावर एसटी बसचे अवशेष सापडले
 • एसटी बसमधील मृत प्रवाशांच्या वारसांना सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर
 • एसटी बसमधील मृत कर्मचार्‍यांच्या वारसांना 10 लाखांची मदत किंवा घरातील एकाला एसटीमध्ये नोकरी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2016 07:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...