हेच का पालकमंत्री? प्रश्न विचारणार्‍या पत्रकाराला प्रकाश मेहतांची दमदाटी

हेच का पालकमंत्री? प्रश्न विचारणार्‍या पत्रकाराला प्रकाश मेहतांची दमदाटी

  • Share this:

mehata_prakash04 ऑगस्ट : महाडच्या दुर्घटनेमुळे उभा महाराष्ट्र हळहळत असतानाच त्याच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता मात्र, 'सेलफिश'मंत्री बनल्याचं बघायला मिळतंय. कारण आधी ते नॉट रिचेबल होते...नंतर काल ते मुख्यमंत्री पाहणी करत असताना चक्क पुलाच्या बॅकग्राऊंडवर सेल्फी काढण्यात दंग होते आणि आज तर त्यांनी कहरच केला. आज त्यांनी चॅनलच्या रिपोर्टरसोबत हुज्जत घालून दादागिरीही केली. एवढंच नाहीतर त्यांचे समर्थकही यावेळी माध्यमप्रतिनिधीवर धावून आले. त्यामुळे या प्रकाश मेहतांना पालकमंत्री म्हणायचं का सेलफिशमंत्री म्हणायचं हा प्रश्न पडलाय.

अलीकडेच अधिवेशानात काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी भाजप गुंडाचा पक्ष असल्याची टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिल्मी डायलॉग मारत कोण आमच्यावर गुंडगिरीचा आरोप करतोय असा पलटवार केला होता. पण, आज त्यांच्याच पक्षाचे आणि मंत्रिमंडळातले आणि विशेष म्हणजे ज्या रायगडमध्ये भीषण अशी दुर्घटना घडली त्या महाडचे पालकमंत्री प्रकाश मेहताच पत्रकाराला धक्काबुक्की, दमदाटी करत असल्याचं कॅमेर्‍यात कैद झालंय. एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी मेहतांना महाडमध्ये येणार्‍या मृतांच्या नातेवाईकांच्या व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारला असता प्रकाश मेहता पत्रकारावरच भडकले. अत्यंत उद्धटपणे मेहता यांनी उत्तरं दिली आणि माझा पक्ष काय तो पाहून घेईन, तुम्हा मीडियावाल्यांना काय करायचं ते करून घ्या ? अशी दमदाटीच मेहतांनी केली.

प्रकाश मेहता को घुस्सा क्यू आया?

"लोकांचा रोष आहे तो खरा आहे. 36-36 तास झाले आहे आणि लोकांचे मृतदेह मिळत नाही. नातेवाईकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि आम्ही ती पार पाडत आहे. आधुनिक तंत्रणाचा वापर करून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे आम्ही गेलोय. लोकांच्या मृतदेह कसे मिळतील याची कारवाई आम्ही करतोय. त्यानंतर इथं आलेल्या नातेवाईकांना फोटो असो अथवा माहिती देणे असेल. त्यांच्या जेवणा, राहण्याची व्यवस्था नाहीये असा सवाल तांबेंनी केला असता. त्यावर मेहता चांगलेच भडकले, असं जर मीडियावाले म्हणत असेल तर तुम्हाला काय चालवायचे असेल ते चालवा. मी जबाबदारीने बोलतोय. उगीच काही बोलायचं आणि दुनियाला काहीही दाखवायचं. सगळी व्यवस्था शासनाची आहे. इथं चारपाच नातेवाईक आले त्यांची व्यवस्था केलीये. आता जवळपास 35 नातेवाईक इथं आले आहे. ही शासनाची जबाबदारी आहे. मला तुम्हाला बाईट द्यायचा नाहीये...चला..काहीही फालूत विचारायंच...असं चालतंय का कधी ?. लोकांचा रोष असेल तर माझी पार्टी बघेल काय करायचं ते...आता जी घटना घडलीये त्याबद्दल सहानभूती आहे. तुम्हाला काय कळतंय. तुम्ही काय काम केलंय. आम्ही 40 वर्षांपासून या क्षेत्रात काम करतोय. नुसतं बामु घेऊन येऊन उभं राहताय. एवढंच बोलून मेहता तावातावाने निघून गेले. त्यानंतर मेहतांच्या समर्थकांनी पत्रकाराशी धक्काबुक्की करत माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

महाडमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेबद्दल सकाळपर्यंत माहिती नसणे, मुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी आले आहे आणि आपण सेल्फी काढणे असा बेजबाबदारपणा आणि काही विचारल्यावर माझा पक्ष काय तो पाहुन घेईन असा उद्धटपणा करणारे पालकमंत्री आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हे खरंच मंत्री आहे की सेलफिशमंत्री ?असा उपस्थिती होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 4, 2016, 7:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading