महाडदुर्घटनेत 42 बेपत्ता, आतापर्यंत 15 मृतदेह सापडले

महाडदुर्घटनेत 42 बेपत्ता, आतापर्यंत 15 मृतदेह सापडले

  • Share this:

04 ऑगस्ट : महाड दुर्घटनेनं अवघा महाराष्ट्र हळहळलाय. आजचा दिवस बेपत्तांच्या शोधाचा आणि नातेवाईकांचा आक्रोशाने मन पिळवाटून टाकणारा ठरलाय. निसर्गाशी दोन हात करून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. संध्याकाळपर्यंत 15 मृतदेह हाती आले आहे.  घटनास्थळापासून 100 ते 50 किलोमिटर अंतरावर मृतदेह सापडले आहे. या संपूर्ण दुर्घटनेत 42 जण बेपत्ता झाले आहे अशी माहिती जिल्ह्याधिकार्‍यांनी दिली. तर महाड येथील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-पोलादपूर सावित्री नदीवर मंगळवारी रात्री पूल कोसळला. या दुर्घटनेत 2 एसटी बसेस आणि खासगी वाहनं वाहून गेली. दुर्घटनेची माहिती प्राप्त होताच जिल्हाधिकारी आणि पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. हवाईदल आणि तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर तसंच एनडीआएफच्या चार तुकड्या, नऊ बोटी आणि ट्रेलर्स मदतकार्यात गुंतले आहेत. तसंच 35 स्थानिक पोहणारे आणि 7 राफ्टर्स टीमही कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून 1077 या टोल फ्री क्रमांकावर मदतकार्याबाबत समन्वय निर्माण करण्यात येत आहे. बेपत्ता व्यक्तींचा सखोल शोध घेण्यात आहे.

mahad_help (12)

 दुर्घटनेत जयगड  मुंबई (एमएच 20 बीएन 1538), राजापूर र बोरिवली (एमएच 40 एन 9739) या दोन एसटी बसेससह तवेरा (एमएच 07 एच 7837) आणि होंडा सिटी या वाहनांचा समावेश आहे. दोन बसेसमध्ये 26 प्रवासी आणि तवेरामध्ये 8 आणि होंडा सिटीमध्ये 4 आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील माहितीनुसार 4 प्रवासी असे एकूण 42 प्रवासी बेपत्ता झाले आहेत. महाड व परिसरात गेल्या 24 तासात सुमारे 222 मीमी पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. बेपत्ता प्रवाशांपैकी 8 मृतदेह प्राप्त झाले आहेत. शोधण्यात आलेल्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी रुग्णवाहिकेची सेवा तात्काळ सुरू करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

 शोध कार्यासाठी एनडीआरएफचे पथक, नौदल, हवाई दल, स्थानिक पोलीस यांच्यासह 300 किलो वजनाचे लोहचुंबक, बोट, राफटींग, स्कूबा डायव्हिंग, स्थानिक मच्छीमारांची मदत घेण्यात येत आहे. या कामी नियंत्रक म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक संजय पाटील कार्यरत आहेत. शोध पथकातील जवान तसंच बेपत्ता व्यक्तींचे नातेवाईक यांच्या भोजन निवासासाठी महाड मधील विविध सामाजिक आणि सेवाभावी संस्था मार्फतही मदत होत आहे.

मदत कक्षामार्फत शोध कार्यावर नियंत्रण तसंच बेपत्ता, मृतांच्या नातेवाईकांना माहिती देणे मार्गदर्शन करणे तसंच त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था पहाणे या बरोबरच सापडलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन आणि संबंधीतांच्या गावापर्यंत मृतदेह पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. शोध कार्य व्यवस्थितरित्या सुरू आहे. आज रात्री आठ वाजेपर्यंत 14 मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटली आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

महाड अपघातातील 4 ऑगस्ट संध्याकाळपर्यंत सापडलेल्या मृंतदेहांची ओळख

1) एसटी चालक एस.एस. कांबळें (जयगड मुबंई बसचालक) राहणार - चिपळूण, सावर्डे - मृतदेह सापडला आंजर्ले खाडीत

2) रंजना वाझे - (तवेरा गाडीतील प्रवासी) राहणार - घाटकोपर - मृतदेह केंबुर्ली

3) शेवंती मिरगळ (तवेरातील प्रवासी) राहणार - गुहागर - मृतदेह हरिहरेश्वर किनार्‍यावर

4) आवेस चौगुले (राजपूर बोरिवली) राहणार नानवली चिपळूण - दादली पुलाजवळ सापडला

5) पांडुरंग घाग ( राजापूर मुंबई एसटी प्रवासी) राहणार नानवली चिपळूण - महाड केंबुर्लीजवळ सापडला मृतदेह

6) स्नेहल बयकर - राहणार रत्नागिरी सरकोंडी, राजेवाडी जवळ सापडला

7) प्रकाश शिर्के- राहणार संगमेश्वर, रत्नागिरी (केंबुर्लीजवळ सापडला)

8) रमेश कदम - राहणार नांदिवले चिपळूण - वराटी इथे सापडला

9) प्रशांत माने राहणार - जोगेश्वरी - तोराडी म्हसळा इथे सापडला

10) स्नेहा सुनील बयकर -राहणार सैतववाडी -विसावा कॉर्नर इथं सापडला

11) मंगेश काटकर - राहणार विरार -आंबेत इथं सापडला

12) सुनिल बयकर - राहणार सैतववाडी,रत्नागिरी - आंबेत इथं सापडला

13) अनिल बेलेकर - राहणार खंडाळा,रत्नागिरी - आंबेत इथं सापडला

14) जयेश बने - राहणार बोरीवली - म्हाप्रळ इथं सापडला

15) बाळकृष्ण उरक - राहणार नानर राजापूर - केंबुर्ली इथं सापडला 

या घटनेसंदर्भात अधिक माहिती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियंत्रण कक्ष सुरू असून अप्पर जिल्हाधिकारी पी डी मलिकनेर आणि निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल हे नियंत्रण करीत आहेत. 02141-222118 टोल फ्री नंबर 1077 असे नियंत्रण कक्षाचे क्रमांक आहेत.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 4, 2016, 10:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading