News18 Lokmat

शोधकार्यातील राफ्टिंग बोट उलटली, सर्व जवान सुखरुप

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2016 01:51 PM IST

 शोधकार्यातील राफ्टिंग बोट उलटली, सर्व जवान सुखरुप

04 ऑगस्ट : महाडजवळ सावित्री नदीवरील पूल कोसळल्यामुळे बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या शोध मोहिमेतील एक राफ्टिंग बोट आज (गुरुवारी) सकाळी उलटली. या बोटीतील सर्व जवानांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. सावित्री नदीत पडलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यावेळी शोधकार्यासाठी नदीत उतरवण्यात आलेली राफ्टिंग बोट उलटली. या बोटीवर पाच जवान होते. पण लगेचच इतर राफ्टिंग बोटींच्या साह्याने इतर जवानांनी या बोटीतील जवानांना नदीतून बाहेर काढलं.

मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळील जुना पूल मंगळवारी रात्री कोसळला. या दुर्घटनेमुळे दोन एसटी बससह पाच ते सात वाहने सावित्री नदीत वाहून गेली. नदी बुडालेल्या वाहनांचा आणि प्रवाशांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची 4 पथके, त्याचबरोबर तटरक्षक दलाचे जवान घटनास्थळी कार्यरत आहेत. एनडीआरएफ जवान, नौदल, तटरक्षक दल, राफ्टर्सनी काल दिवस मावळल्यानंतर थांबवलेलं शोधकार्य आज सकाळी पुन्हा सुरू केलं. त्याचवेळी राफ्टिंग बोट पाण्यात उलटल्याची दुर्घटना घडली. पण इतर जवानांनी पाण्यात पडलेल्या पाच जवानांना लगेचच बाहेर काढले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2016 01:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...