सर्व जुन्या पुलांचं ऑडिट करणार- मुख्यमंत्री

सर्व जुन्या पुलांचं ऑडिट करणार- मुख्यमंत्री

  • Share this:

03 ऑगस्ट : महाड दुर्घटनेमुळे राज्य सरकारला खडबडून जाग आलीये. राज्यातील सर्वच जुन्या पुलांचं ऑडिट करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. मुख्यमंत्र्यांनी महाड येथे घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि मदतकार्य पूर्ण वेगात सुरू आहे आहे, राज्य सरकार पाहिजे ती सर्व मदत सुरू आहे अशी माहिती दिली.

cm_mahadaमुंबई गोवा महामार्गावर महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळण्याची घटना 2 ऑगस्ट रात्री 11.30 वाजता घडली आहे. प्रत्यक्षदर्शीने 14-15 गाड्या वाहून गेल्याचे सांगितले परंतु चौकशीअंती सदरची व्यक्ती नशेत होती. दुसर्‍या प्रत्यक्षदर्शीने दोन एस. टी. बसेस वाहून गेल्याचं सांगितलं असल्याचं माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.

घटनेच्या शोधकार्यासाठी एक एअरफोर्सचे आणि एक कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर महाड येथे पोहोचले असून एनडीआरएफच्या 2 टीम ज्यामध्ये 40 जवान, स्वीमर बोट आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा तेथे पोहोचली होती. सावित्री नदीवरील हा पूल ब्रिटीशकालीन होता. या पुलास पर्यायी पूल तयार करण्यात आला होता. यावर 2001 पासून वाहतूक सुरू केली होती. हा पूल वाहतुकीस योग्य असल्याची तपासणी मे 2016 मध्ये केली होती. घटनास्थळी शोध आणि मदतकार्य सुरू असल्याची माहिती महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री

चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री रायगड प्रकाश महेता, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे तसंच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 3, 2016, 5:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading