महाड दुर्घटनेत पितापुत्र बेपत्ता, कुटुंबियांना धक्का

महाड दुर्घटनेत पितापुत्र बेपत्ता, कुटुंबियांना धक्का

  • Share this:

mahad_father_son03 ऑगस्ट : महाड येथील दुर्घटनेत एसटी राजापूर-बोरीवली बसमधील ड्रायव्हर गोरखनाथ मुंढे हे बेपत्ता झालेत. गोरखनाथ मुंढे हे परभणी जिल्ह्यातल्या अंतरवेली गावचे राहणारे आहेत. ते बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानं त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. गोरखनाथ यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते चिपळूण आगारात कार्यरत आहेत.

तर दुर्घटनाग्रस्त जयग़ड- मुंबई बसमध्ये चालक श्रीकांत कांबळे आणि त्यांचा मुलगा महेंद्र बेपत्ता झालाय. श्रीकांत कांबळे यांचा महेंद्र मुलगा मुंबईला नोकरीच्या मुलाखतीसाठी निघाला होता. तो ही याच बसमध्ये होता. पितापुत्र बेपत्ता झाल्यानं कांबळे कुटुंबीयांनाही धक्का बसलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 3, 2016, 5:24 PM IST

ताज्या बातम्या