ठाकरे-वायकरांची रायगडमध्ये 900 कोटींची जमीन खरेदी- संजय निरुपम

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2016 10:47 PM IST

sanjay nirupam02 ऑगस्ट : काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष यांनी थेट 'मातोश्री'वर हल्ला चढवलाय. राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या पत्नीसोबत उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची व्यावसायिक भागिदारी असल्याचा खळबळजणक आरोप संजय निरुपम यांनी केलाय. वायकर यांची 'मातोश्री'शी पार्टनरशीप असून रायगड मुरुड या भागात उद्धव ठाकरे आणि वायकर यांच्या पत्नींनी 900 कोटींची साडेचारशे एकर जमीन खरेदी केली आहे असा गंभीर आरोप निरुपम यांनी केलाय.

एकीकडे वेगळ्या विदर्भाच्या मुद्दावर शिवसेनेनं काँग्रेसला साथ दिल्याचं चित्र गेल्या चार दिवसांपासून पाहण्यास मिळत होतं. तर आज दुसरीकडे काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. जोगेश्वरीमध्ये स्वप्नपूर्ति प्रोजेक्ट विजयालक्ष्मी कंपनी तयार करत आहे, त्याच विजयालक्ष्मी इंफ्रा कंपनीमध्ये रवींद्र वायकर पार्टनर आहे. एस आर ए प्रोजेक्टमध्ये रवींद्र वायकर यांचा सहभाग आहे. त्यामुळे वायकर यांना क्लिनचिट देणार्‍या मुख्यमंत्र्यांनी माफ़ी मागावी आणि रवींद्र वायकर यांच्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी संजय निरूपम यांनी केलीय. तसंच वायकर यांची मातोश्रीशी पार्टनरशीप आहे. रायगड मुरुड भागात उद्धव ठाकरे आणि वायकर यांच्या पत्नीनी साडेचारशे एकर जमीन खरेदी केली आहे असा आरोपही निरुपम यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2016 10:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...