लग्नास नकार दिला म्हणून तरुणीवर चाकू हल्ला

  • Share this:

धुळे, 02 ऑगस्ट : लग्नास नकार दिल्याने महाविद्यालयीन तरुणीवर जीवघेणा चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना जिल्ह्यातील शिंदखेडा येथे घडली आहे. महाविद्यालयीन तरुणीने लग्नास नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने तरुणीला रस्त्यात अडवून तिच्या गळा आणि छातीवर धारदार चाकूने वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारार्थ धुळे येथे जिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. मयूर गिरासे असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे.crime scene

चिरणे गावातील 21 वर्षाच्या तरुणी शिंदखेडा येथील महाविद्यालयात टीवायबीएचे शिक्षण घेतेय. याच कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा मयूर राजेंद्र गिरासे हा नेहमी लग्न करावे यासाठी तगादा लावून तरुणीला जीवे ठार मारण्याची धमकी देत असे. काल ही तरुणी कॉलेज करून रिक्षाने मैत्रिणीबरोबर आपल्या गावी जात असताना, मयूर गिरासेने तरुणीच्या रिक्षाचा बाईकने पाठलाग केला.

दरम्यान, रस्त्यावरील रिक्षा अडवून तरुणीला आपल्या सोबत लग्न करण्याचा आग्रह धरला. त्याला तरुणीने विरोध केला. यावेळी संतापलेल्या मयूरने तरुणीवर सुरीने वार करून जखमी करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मयूर पसार झाला. दरम्यान पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मयूर गिरासे विरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी फरार मयूर गिरासे याला पोलिसांनी अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2016 05:30 PM IST

ताज्या बातम्या