आयपीएलला उन्हाच्या झळा

आयपीएलला उन्हाच्या झळा

9 एप्रिलआयपीएलमध्ये पुढच्या आठवड्यात सेमी फायनलचे चित्र जवळ जवळ स्पष्ट होईल. स्पर्धेतली चुरस जशी वाढतेय, तशी टीमसमोरची आव्हानेही वाढत आहेत. एप्रिल महिना सुरू झाल्यापासूनच सगळीकडे उकाडा वाढला आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत तापमान किमान 5 अंश सेल्शिअसने वाढले आहे. नागपूर, जयपूर आणि दक्षिण भारतात तर तापमानाने काही ठिकाणी 43 ते 45 डिग्रीजचा आकडाही ओलांडला आहे. उष्ण हवामान आणि आर्द्रता याचा परिणाम क्रिकेटवरही जाणवायला लागला आहे. चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरलाही उष्णतेचा फटका बसला. थकवा जाणवल्यामुळे त्याने मैदान सोडले आणि थोडा वेळ विश्रांती घेतली. पण अखेर मोठा शॉट खेळण्याच्या नादात तो आऊट झाला. थोडक्यात या आयपीएलमध्ये हवेतील उकाडाही निर्णायक ठरणार आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2010 11:15 AM IST

ताज्या बातम्या