तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेल्वे तीन तासांपासून ठप्प

तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेल्वे तीन तासांपासून ठप्प

  • Share this:

monorail-mumbai_2342196g

मुंबई – 01 आॅगस्ट : पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या खोळंब्याच्या घटना मुंबईकरांसाठी नित्याची बाब झाली असताना यामध्ये आता मोनोरेल्वेची भर पडली आहे. तांत्रिक बिघाडामुळे चेंबूर ते वडाळ्यादरम्यानची मोनोरेलची वाहतूक गेल्या तीन तासांपासून बंद पडली आहे.

आज सकाळी सहा वाजता भक्ती पार्कजवळ एक मोनो रेल्वे अडकली होती. ही रेल्वे ओढून आणण्यासाठी दुसरी रेल्वे पाठविण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची फायर ब्रिगेडच्या मदतीने सुटका करण्यात आली असून सध्या मोनो प्रशासनाकडून हा तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. हा बिघाड आणखी दोन तासांचा अवधी लागेल, अशी माहिती मोनो प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2016 09:52 AM IST

ताज्या बातम्या