नासेरने बाॅम्बही बनवला, मराठवाड्यात घडवायचा होता घातपात !

नासेरने बाॅम्बही बनवला, मराठवाड्यात घडवायचा होता घातपात !

  • Share this:

30 जुलै : परभणीतून अटक केलेल्या आयसिस समर्थक नासेरबेन चाऊसला 15 ऑगस्टला मराठवाड्यात घातपात घडवायचा होता अशी धक्कादायक माहिती समोर आलीये. एटीएसनं चाऊसला परभणीतून अटक केलीये. त्याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर येतेय. चाऊसनं सीरियातून आलेल्या डायग्रामच्या मदतीनं आयईडी बॉम्बही बनवला होता.

nasir_chusपरभणी येथून अटक केलेल्या संशयित इसिसच्या हस्तकांकडे मोठा स्फोटकांचा साठा असल्याची माहिती एटीएसच्या अधिकार्‍यांनी कोर्टात बोलून दाखवली आहे.त्यामुळं औरंगाबाद खंडपीठानं अटक झालेल्या हस्तकांची पोलीस कोञडी आता 12 ऑगस्टपर्यंत वाढवून दिली आहे.या प्रकरणाची चौकशी बंद दालनात सध्या सुरू आहे. आरोपींचा 15 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात मोठा घातपाताची तयारी होती. आरोपींकडून सध्या अर्धाच स्फोटकांचा साठा जप्त केलाय. आणखी हस्तकांसोबतच स्फोटकांचा साठा शोधायचा आहे अशीही माहिती एटीएसच्या अधिका-यांनी कोर्टोसमोर मांडली आहे. अटकेत असलेल्या नासेरबेन चाऊस या परभणीच्या तरूणाकडे सिरियामधून बॉम्ब चा डायग्राम सुध्दा आला आहे. हवाला मार्फेत बॉम्ब बनवण्यासाठी पैसा जमवला आणि एक आयईडी बॉम्बसुद्धा तयार केला होता अशी माहिती एटीएसनं कोर्टात दिली. मात्र आरोपींना एटीएस मुद्दाम गुंतवत असल्याचा आरोप आरोपींच्या वकिलांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 30, 2016, 7:47 PM IST

ताज्या बातम्या