29 जुलै : हेल्मेट नसेल तर पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली खरी पण त्यांचा निर्णय सरकारच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने तुर्तास एक पाऊस मागे घेत 5 ऑगस्टपर्यंत या निर्णयाला
स्थगिती देण्याची शक्यता आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेट सक्ती राबवण्यासाठी 'नो हेल्मेट नो पेट्रोल' अशी अभिनव कल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. येत्या 1 ऑगस्टपासून राज्यभरात याची अंमलबाजवणी होणार आहे. पण, पुणेकरांसह पेट्रोल पंपचालकांनी याला कडाडून विरोध केला. पेट्रोल पंप चालकांनी या निर्णयाला विरोध करत 1 ऑगस्टपासून बंदचा इशारा दिला. काल गुरुवारी विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हेल्मेट सक्ती असावी पण नो हेल्मेट नो पेट्रोल असा निर्णय घेऊ नये अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करून मध्यममार्ग काढू असं आश्वासन दिलं होतं. अखेर आज दिवाकर रावते यांनी तुर्तास एक पाऊस मागे घेतल्याचं दिसतंय. दिवाकर रावते आणि पेट्रोलपंप असोसिएशन यांच्यात बैठक झालीय. या बैठकीनंतर नो हेल्मेट नो पेट्रोल कारवाईला 5 ऑगस्टपर्यंत स्थगिती मिळण्याचे संकेत रावतेंनी दिले. नो-हेल्मेट नो पेट्रोल संदर्भात 1 ऑगस्टला राज्य सरकार आपली भुमिका स्पष्ट करणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv