नाशकात पिसाळलेला कुत्रा चावल्याने 5 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

नाशकात पिसाळलेला कुत्रा चावल्याने 5 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

  • Share this:

dog_bitting3 नाशिक, 29 जुलै : पिसाळलेला कुत्रा चावल्यानं अवघ्या 5 वर्षीय समीक्षाला आपला जीव गमवावा लागलाय. कसारे गावातील शाळेच्या आवारात कुत्र्यानं तिचा चावा घेतला होता. 4 जुलैपासून समीक्षाची मृत्यूशी झुंज आज अपयशी ठरली.

संगमनेर तालुक्यातील कसारा गावात जिल्हा परिषदेतच्या शाळेत शिकणारी समीक्षा लहामगे ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे 4 जुलैला शाळेत आली. पण शाळेला कंपाऊंड नसल्यानं आवारात फिरत असलेल्या पिसाळलेल्या कुत्र्यानं तीचा चावा घेतला. समीक्षाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण, उपचारात काही फरक पडला नाही.

समीक्षाला वाचवण्यासाठी तीच्या पालकांनी अनेक दवाखान्याचे उंबरठे झिजवले. नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 4 दिवसांपासून समीक्षावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. कसारे गाव हे शिर्डीजवळ असल्यानं,शिर्डीगावात फिरत असणार्‍या मोकाट आणि भटक्या कुत्र्यांना कसारे गावात आणून सोडतात असा आरोप समीक्षांच्या वडिलांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 29, 2016, 7:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading