News18 Lokmat

मुंबईमध्ये पावसाची दमदार हजेरी, वाहतुकीवर परिणाम

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2016 03:29 PM IST

मुंबईमध्ये पावसाची दमदार हजेरी, वाहतुकीवर परिणाम

मुंबई - 29 जुलै :  मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने रात्रीपासूनच लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पावसामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे पनवेल वाहतूक ठप्प झाली तर या पावसाचा विमान उड्डानालाही फटका बसल्याने अनेक उड्डाणं 15 ते 20 मिनिटे उशिराने उड्डाण घेत आहेत. सायन-घाटकोपर ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक जॅम झाले.

मुंबई, ठाण्यात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू असून बदलापूर, अंबरनाथ, कल्याणमध्ये संततधार सुरू आहे. पावसाने मध्यरात्रीपासून बॅटींग केल्याने रेल्वेच्या तिन्ही मार्गाला फटका बसला. सकाळी ऑफिसला पोहोचणार्‍या चाकरमान्यांना याचा फटका बसला. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-पनवेल वाहतूक ठप्प झाली. नेरुळ स्टेशनात तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल बंद पडल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला.

मुंबईतील असंख्य भागातील सखल भागात पाणी साचल्याने ट्रॅफिक जॅम झाले. मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. धावपट्टीवरील पाणी आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने उड्डाण घेत आहेत. तसंच रेल्वे सेवेलाही पावसाचा फटका बसला. तिन्ही मार्गावरील रेल्वे उशिराने 20 ते 25 मिनेट उशिराने धावत आहेत. किंग्ज सर्कलमध्ये रस्ता पाण्याखाली गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2016 10:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...