लोकलमध्ये महिला प्रवाशांची गुंडगिरी, तरुणीला बेदम मारहाण

लोकलमध्ये महिला प्रवाशांची गुंडगिरी, तरुणीला बेदम मारहाण

  • Share this:

मुंबई, 28 जुलै : मुंबईच्या लोकल ट्रेनमधील पुरुष आणि महिलांच्या डब्यात होणारी वादावादी आणि हाणामारी सर्वांनाच माहित आहे. त्यापैकी विरार लोकल या घटनांसाठी कुप्रसिद्धच म्हणावी लागेल. वसईला उतरण्यासाठी विरार लोकलच का पकडली ?, असा उर्मट सवाल करत महिलांच्या टोळक्याने एका 20 वर्षीय इंजिनीअरिंगच्या तरुणीला जबर मारहाण केली. ऋतुजा नाईक असं मारहाण झालेल्या तरुणीचं नाव आहे. या प्रकरणी वसई रोड रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Rutuja_Naikसिव्हील इंजिनिअरिंगला शिकत असणारी ऋतुजा दिलीप नाईक ही कॉलेजमध्ये जाण्यासाठी विरारला चर्चगेटच्या 8.40 च्या ट्रेनमध्ये बसली आणि ती विरार ते वसईच्या दरम्यान ट्रेन मधल्या महिलांच्या एका ग्रुपने तू बोरीवली अंधेरी च्या ट्रेनमध्ये का चढली नाही ? असं म्हणून तिला मारहाण केली. ती आपला जीव सांभाळत वसईला उतरली. ट्रेन मधील ग्रुपबाजी ही काही नवीन नाही. मग तो डबा कोणताही असो महिलांचा किंवा मालवाहू सामानाचा प्रत्येक ट्रेनमध्ये ग्रुपबाजी चालते त्यामुळे अशा घटनांमध्ये अनेकांचे बळी सुद्धा गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 28, 2016, 8:35 PM IST

ताज्या बातम्या