मुंबई महापालिका बरखास्त करा - नारायण राणे

 मुंबई महापालिका बरखास्त करा - नारायण राणे

  • Share this:

senior-congress-leader-narayan-rane-addresses-a-press-conference-after-resigning-03

मुंबई - 28 जुलै : घोटाळ्यांमुळे बदनाम झालेली मुंबई महापालिका बरखास्त करण्याची मागणी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आज (गुरूवारी) विधानपरिषदेत केली. विधान परिषदेत आज कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे रस्ते घोटाळ्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या बांधणीसाठी देण्यात येणार्‍या कंत्राट प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यामध्ये तब्बल नऊ हजार कोटींचा घोटाळा देण्याचा आरोप केला.

यामध्ये स्थायी समितीसह अनेक राजकारण्यांचे हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे या सगळ्याची चौकशी करून घोटाळ्यामध्ये सहभागी असणार्‍या राजकारण्यांची नावे उघड केली जाणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रस्ते घोटाळ्यात कंत्राटदारांवर एक आणि कर्मचार्‍यांना दुसरी कलमं लावण्यात आली आहेत. काळ्या यादीतले कंत्राटदार हे राजकारण्यांचे पार्टनर आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी नारायण राणेंनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 28, 2016, 3:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading