बोगस डॉक्टराच्या उपचारामुळे 3 जणांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jul 27, 2016 08:48 PM IST

चंद्रपूर -27 जुलै : जिल्ह्यात बोगस डॉक्टरनं केलेल्या उपचारात 3 जणांचा मृत्यू झालाय, तर दोण जणांवर उपचार सुरू आहेत. चंद्रपूरच्या राजूरा तालुक्यातल्या लक्कडकोट परिसरातली ही घटना आहे. बोगस डॉक्टर सध्या फरार आहे.या घटनेनं आरोग्य विभाग हादरुन गेलंय.आता या डॉक्टरविरुद्ध आरोग्य विगागाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.doctor

तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या लक्कडकोट परिसरात तापाची साथ असल्याने आजारी रुग्ण कमलाबाई कोलपाकवार तर कोष्टाळा येथील मुक्ताबाई सातपुते यांच्यासह अनेकांना तापाची लागण झाल्यावर गावातल्या डॉक्टर म्हणून काम करणार्‍या भोपाल नावाच्या इसमाकडे गेल्यावर कुठलीही वैद्यकीय पदवी नसलेल्या भोपालने उपचार करत इंजेक्शन दिले. त्या इंजेक्शनने रुग्णांची प्रकृती आणखी बिघडुन कमलाबाई कोलपाकवार आणि मुक्ताबाई सातपुते या दोघींसह तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन रुग्णावर चंद्रपुरात उपचार सुरू आहे दरम्यान हा प्रकार उघड होताच जिल्हा आरोग्य अधिकारी पोलिसात तक्रार दिल्यावर विरुर पोलीस ठाण्यात या बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. दरम्यान हा डॉक्टर फरार झाला असून त्याच्या खोलीच्या तपासणीत दोन ते अडीच लाख रुपयाचा औषधांचा साठाही जप्त करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2016 08:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close