ऐतिहासिक! डेमोक्रॅटिक पक्षाकडून हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी जाहीर

ऐतिहासिक! डेमोक्रॅटिक पक्षाकडून हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी जाहीर

  • Share this:

hillary_clinton

27  जुलै : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. एखाद्या राजकीय पक्षाकडून महिलेला उमेदवारी मिळण्याची अमेरिकेच्या इतिसाहातली ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या निवडणूकीत आता रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यात लढाई पहायला मिळणार आहे.

फिलाडेल्फियामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेत हिलरी क्लिंटन यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी राज्यांच्या 2383 प्रतिनिधींच्या मतांची गरज असते. हिलरी यांना 2842 मतं मिळाली आहेत. सिनेटर बार्बरा मिकुलस्की यांनी हिलरींच्या नावाची जेव्हा घोषणा केली तेव्हा लोकांनी 'हिलरी...हिलरी' अशा जोरदार घोषणाही दिल्या. अमेरिकेत हिलरींच्या निवडीचं विविध मान्यवरांनी स्वागत केलं आहे.

दरम्यान, अमेरिकेतील फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी त्यांच्या उमेदवारीवर पसंतीची मोहोर उमटविली होती. अमेरिकेचे पहिले कृष्णवणच्य अध्यक्ष बराक ओबामा यांची कारकीर्द आणि हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी देशातील ऐतिहासिक घटना असल्याचं मिशेल ओबामा म्हणाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 27, 2016, 8:36 AM IST

ताज्या बातम्या