S M L

मुंबईकरांना 100 युनिटपर्यंत मिळणार समान वीजदर !

Sachin Salve | Updated On: Jul 26, 2016 09:27 PM IST

 मुंबईकरांना 100 युनिटपर्यंत मिळणार समान वीजदर !

 

मुंबई, 26 जुलै : मुंबईला वीज पुरवठा करणार्‍या टाटा आणि रिलायन्स या दोन्ही कंपन्यांचे सीएजी (कॅग) मार्फत ऑडिट केजे जाईल तसंच लवकरच 0 ते 100 युनिट पर्यंत मुंबईकरांना वीज दर समान मिळतील अशी घोषणा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली.

मुंबईत वीज पुरवठा करणार्‍या रिलायन्स, टाटा, महावितरण आणि बेस्ट या चारही कंपन्यांचे वीज दर वेगवेगळे असल्याने मुंबईकर त्रस्त आहेत. एकाच शहरात चार दर असू नये अशी मागणी सरकार कडे गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे.आज विधान सभेत याबाबत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना यावर्षी 0 ते 100 युनिट पर्यंत समान दर असतील आणि पुढच्या टप्प्यात 300 युनिटपर्यंत समान दराचा राज्य सरकारचा प्रयत्न राहिल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. मुंबईला वीज पुरवठा करणार्‍या टाटा आणि रिलायन्स कंपन्यांचे कॅगकडून ऑडिट केल जाईल अशी घोषणा ही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2016 09:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close