News18 Lokmat

कल्याणमध्ये घरगुती सिलेंडरचा स्फोट, 1 ठार

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2016 02:59 PM IST

कल्याणमध्ये घरगुती सिलेंडरचा स्फोट, 1 ठार

25 जुलै : कल्याणच्या आधारवाडीतल्या गायकवाड निवास इमारतीत झालेल्या सिलेंडर स्फोटात एका महिलेचा मृत्यू झालाय. ताराबाई गायकवाड असं या मृत महिलेचं नाव आहे. या स्फोटात एकूण 11 जण जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय.

कल्याण पश्चिम आधारवाडी इथल्या रवी गायकवाड़ यांच्या गायकवाड निवास इमारतीत सकाळी 6.30 च्या सुमारास घरगुती गॅस चा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, आजूबाजूच्या इतर तीन घरांचं सुद्धा नुकसान झालं असून घराच्या भिंती पुर्ण पडल्या आहेत. या स्फोटात 11 जण जखमी झाले असून 70 वर्षीय ताराबाई गायकवाड यांचा मृत्यू झाला आहे. जखमींना सायन रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. शबाना शेख यांच्या घरात गॅस लिकेज झाला होता. सकाळी लाईटचे बटन लावताच गॅसचा स्फोट झाला आणि हा सर्व प्रकार घडल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2016 02:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...