कल्याणमधून आयसिस संशयित रिझवान खानला अटक

कल्याणमधून आयसिस संशयित रिझवान खानला अटक

  • Share this:

rizhvan43 

23 जुलै : कल्याणमधून आयसिसच्या संशयित रिझवान नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रिझवानवर तरुणांना आयसिसमध्ये भरती होण्यासाठी प्रवृत्त करण्याचा आरोप आहे. केरळ पोलीस आणि महाराष्ट्र एटीएसची ही संयुक्त कारवाई आहे.

रिझवानला केरळ पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे, असंही कळतंय. नवी मुंबईतून आर्शिद कुरेशीला अटक करण्यात आली होती. कुरेशी हा झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशमध्ये काम करायचा.आर्शिद प्रभावित झालेल्या तरुणांना रिझवानकडे माहितीपट बघण्यासाठी पाठवायचा.

त्यामुळे आयआरएफशी रिझवानचा थेट संपर्क नसला, तर तरुणांना भडकवण्यामध्ये अप्रत्यक्ष संबंध असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. केरळमधूनच काही दिवसांपूर्वी 2 जण आयसिसमध्ये भरती होण्यासाठी देशातून पळाले होते. त्यानंतर या सगळ्या तपासात केरळ पोलीस खूप सक्रिय झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 23, 2016, 2:54 PM IST

ताज्या बातम्या